Ticker

6/recent/ticker-posts

अकलुज येथे श्रावण महिन्यानिमित्त श्री मल्लिकार्जुन मंदिरातील महादेवास रुद्राभिषेक संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज:- आपल्या भारतभूमी जिथे पूजा विधी केवळ कृती नसतात तर परंपरेचा गूढ अर्थ मांडतात.जिथे पूजा केवळ समारंभ नसतो तर आत्मशुद्धीचा मार्ग असतो.पवित्र श्रावण मासानिमित सकल भाविक भक्तांच्या आयुर - आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी श्री  मल्लिकार्जुन महादेवास रूद्र अभिषेक,बिल्वार्चन आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
        या कार्यक्रमासाठी श्री १०८ राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर-शिंगणापूर व श्री १०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई या महास्वामींच्या दिव्यसानिध्यामध्ये अकलूजमध्ये संपन्न झाला.महाराजांची पद्यपूजा श्री व सौ सुनील जठार व श्री व सौ विजयराव टोंगळे यांनी केली.श्री वाईकर महाराजांनी समाजाने एकत्र राहून प्रगती करावी हे उदाहरणांमधून दाखवून दिले तर श्री शिंगणापूरकर महाराजांनी रुद्र पठण व रुद्र पूजेचे महत्व पटवून दिले व नित्य लिंगपूजा रुद्र पठण करावे असे सांगितले.या कार्यक्रमामध्ये ४० दांपत्यांनी रुद्र अभिषेकामध्ये सहभाग नोंदवला १०८ नामावली व बिल्वारचंन झाले.श्री मल्लिकार्जुन महादेवास श्री योगेश व सौ पूनम गुळवे दाम्पत्य व श्री सचिन व सौ ज्योती कथले यांनी रुद्र अभिषेक केला.महाआरती होवून कार्यक्रमाची सांगता झाली व आलेल्या सर्व शिवभक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमामधे महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था व वीरशैव लिंगायत समाज,अकलूज यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.सदरच्या कार्यक्रमासाठी महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था,अकलूज यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या