Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वाटपासाठी तपासणी शिबिर संपन्न

मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपूर- माजी वित्त, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आ. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्थानिक ठाकूर बाडी समाज मंदिर, फुटबॉल ग्राउंड, कृष्ण नगर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेची माहिती वैद्यकीय अधिकारी कविश्वरी कुंभळकर यांनी एकूण २० आजाराला मुख्यमंत्री सहायता निधीची मदत मिळते याबाबत विस्तृत विशद केले आणि समाजसेवा अधिक्षक भास्कर झळके यांनी योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्राची माहिती उपस्थितांना दिली. 
इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई यांच्यामार्फत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कोमोड शीट, मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, साधी काठी, वॉकर, इत्यादी वस्तू मोफत मिळणार आहेत याकरिता आज प्राथमिक तपासणी शिबिरचे चंद्रपूर शहरमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवावी असे आवाहन उपस्थित नागरिकांना त्यांनी केले.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई चे आकाश यादव यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी यांच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांना कार्यक्रम आयोजन केला यासाठी त्यांनी विशेष आभार मानले कारण की प्रथमच चंद्रपूर शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजन होत आहे आणि यापुढे सुद्धा त्यांनी असे कार्यक्रम आयोजन करावे असे विनंती सुद्धा केली ज्याने जास्तीत जास्त ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे देता येतील.
कार्यक्रमाचे संचालन व आभार निलेश पाझारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुभाष मुरस्कर, आरिफ शेख, नरेश दास, सुभाष मोहुर्ले, भास्कर कांबळे, शिवसागर चंदनखेडे, रवींद्र उपरे, पुष्पा सावसाकडे तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी, ठाकूरबाडी समाज मंदिर यांचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या