Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नान्नज येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरीअण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज होते :- सुनील साळवे....


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- - नान्नज ता. जामखेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
        यावेळी उदय पवार, दादाराजे भोसले, सद्दाम पठाण, संजय साठे, राजू साठे, सुनील साठे, राजू पठाण, भिवा साठे, दादा कांबळे, मेजर प्रकाश राऊत, माने मेजर, भाईजी साळवे, सतीश (नाना) साळवे, अभिजीत साळवे, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       सुनील साळवे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते वंचितांचा आवाज होते. 
      दिड दिवसांची शाळा शिकून त्यांनी जी प्रचंड साहित्यसंपदा निर्माण केली, ती आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी समाजातील दीन-दुबळ्या, शोषित, वंचित वर्गाच्या व्यथा शब्दांत मांडल्या आणि त्या शब्दांनी क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या