Ticker

6/recent/ticker-posts

संस्कार भारती भंडारा समिती चा कृष्ण गोपिकाउत्सव श्री. बहिरंगेश्वर मंदिर खांबतलाव येथे संपन्न झाला.संस्कार भारती तर्फे श्रीकृष्णरूप सज्जा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संस्कार भारती ,शाखा भंडारा तर्फे स्थानिक बहिरंगेश्वर मंदिर येथे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रविवार रोजी दुपारी 2.30 वाजता श्रीकृष्ण रुपसज्जा चे आयोजन केले होते.  अतिशय जल्लोषात जवळपास 20 बालकृष्ण आणि गोपिकांनी यात सहभाग नोंदविला. सहभागी गोपाल होते रणविजय सिंह बाच्छिल,  रीत बाच्छिल ,संवेद रजनी गराडे ,दूर्वा भाजीपाले , लविक ठाकरे, आद्या याज्ञिक,  लक्ष मंदुरकर, वैदेही ब्राह्मणकर, हर्ष पाथोडे, शिव पाथोडे ,श्रावी खंडाईत, हर्षदा चौधरी, योशिता गराडे. कार्यक्रमाचे संचलन सौ अनघा चेपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती अध्यक्ष सुमंत देशपांडे, आमचे मार्गदर्शक दत्ता दाढी, कोषाध्यक्ष केशव जोशी, मंत्री मोहन भाकरे, आमच्या मार्गदर्शिका डॉ.अश्विनी व्यवहारे आमचेआधारस्तंभ डॉ.नरेंद्र व्यवहारे,भुअलंकरण विधाप्रमुख नीता मलेवार ,नृत्य विभाग प्रमुख चंदा मुरकुटे, चित्रकला विधाप्रमुख अनघा चेपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या