Ticker

6/recent/ticker-posts

टाटा सोलर प्रकल्पामुळे पाणी शेतात शिरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप..

कारला गाव शिवारातील शेतीचे मोठे नुकसान
 कंपनीने नाला सरळीकरण केले नसल्यामुळे शेतकरी संतप्त ..

लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड 

नांदेड  :-टाटा पॉवर कंपनीकडून बोरगडी रस्त्यावरील व कारला शिवारातील जवळपास दीड ते दोन हजार एकर जमीन खरेदी करून या ठिकाणी सोलार पॅनल प्रकल्प तयार केला आहे.सदरील जमिनीवर सिमेंट काँक्रीट बांधकाम झाले  असेल या जमिनीत मोडणारे पाणी कारला शहरात जात  असल्याने पुराचा ओघ वाढत असल्यामुळे दोन दिवसापासून नाल्यांना पूर वाहू लागला आहे यामुळे सर्व जमिनी खरडून गेल्या आहेत.यास टाटा पावर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
      हिमायतनगर तालुका भरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून अतिवृष्टी  सदृश्य पाऊस पडला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत.यातच बोरगडी, कारला शिवारात टाटा पॉवर कंपनीकडून मोठा सोलार प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे या सोलार मध्ये जमिनी दिल्या त्या जमिनीतील पाणी जागेवर मुरत होते परंतु सदरील सोलारच्या ठिकाणी जमिनीवर सिमेंट काँक्रेट बांधकाम असल्याने या हजारो एकरावरील शेताचे पाणी कारला गावाकडे वळण घेत असून यामुळे नाल्यांनी पुराची पातळी ओलांडली आहे.
 उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती.तेव्हा नाला सगळीकरण करून बंधारे बांधून देऊ असे अधिकारी सांगितले होते. मात्र पुन्हा या अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे आज पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली असून दोन दिवसापासून पूरस्थिती आहे. कारला शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन कापूस सोयाबीन हळद दूर आधी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे टाटा कंपनीसह प्रशासनाने तात्काळ पचनामे करून पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. टाटा कंपनीचे कारला गावातील नाल्यांची ची दुरुस्ती करून मदत देण्याची मागणीही जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या