Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद नंदूरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन!


२० मागण्यांसाठी आंदोलन; बिरसा फायटर्सने दिला पाठिंबा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदूरबार च्या वतीने दिनांक १९ ऑगस्ट २०२५ पासून जिल्हा परिषद नंदूरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.एकच नारा समायोजन करा,अशा जोरदार घोषणा देत आंदोलन कर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.आंदोलन स्थळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी भेट देत संघटनांचा पाठिंबा जाहीर केला.
                    १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे १००% समायोजन व प्रत्येक वर्षी ३०% प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग. ग्राम विकास विभाग, नगरविकास विभाग, वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागामध्ये करणे, Performance Reporn नुसार (outstanding 04%, Excellent ०४%, Good ०२%) मानधनवाढ न करता सरसकट दरवर्षी ८% व एकवेळची बाब म्हणुन सन २०२५-२०२६ मध्ये १०% प्रमाणे वार्षिक याढ करावी.३ वर्ष व ५ वर्ष सेवा पुर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना लॉयल्टी बोनस पुर्ववत लागु करावा.ईपीएफ व ग्रॅज्युटी योजना १५५००/- त्यापेक्षा जास्त मानधन असणा-या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना लागु करावी.कर्मचारी यांना विमा संरक्षण (अपघाती मृत्यू करीता ५० लक्ष, अपंगत्व करीता २५ लक्ष. औषधोपचार करीता २ते ५ लक्ष) प्रमाणे लागू करावे. दि. १४/०३/२०२४ पासून मृत्यू झालेल्या कर्मचारी यांना राज्य वेलफेअर फंडातून रु. ५० लक्ष तात्काळ मदत जाहिर करावी.समुदाय आरोग्य अधिकारी यांचे एकत्रीत मानधन रु.४००००/-करावे व लॉयल्टी बोनस पुर्ववत लागु करावा.समायोजन प्रमुख मागणीचा कालबध्द कार्यक्रम जाहिर करावा, अशा एकूण २०  मागण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या