Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी क्रांती मोर्चा ने घेतली राष्ट्रीय मागासवर्गीय अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट...... ओबीसी समाजातील विविध समस्यांकडे वेधले लक्ष.....


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:- भंडारा जिल्हा दौऱ्यावर आलेले मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांची ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते सह यशवंत सूर्यवंशी, जीवन भजनकर, राजपूत सर, वाहीद बाबर, भागीरथा थोटे या पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेविका मधुरा मदनकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी जातनिहाय जनगणनेबाबत सविस्तर चर्चा झाली. समाजमाध्यमांतून अशी माहिती समोर आली आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या आगामी जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसणार आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगत ओबीसींसाठी वेगळा कॉलम राखीव ठेवावा, अशी ठाम मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात देण्यात आलेल्या ओबीसी वस्तीगृहात मुली सुरक्षित नसून महाज्योती संस्थेला पाहिजे त्या प्रमाणात निधी देण्यात आला नसल्याने ओबीसींवर अन्याय होत असल्याचेही यावेळी लक्षात आणून दिले. तर गेल्या पंधरा वर्षापासून ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मध्येही वाढ झाली नाही. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून योग्य ती दखल घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन हंसराज अहिर यांना करण्यात आले. 
....
...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या