चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : विधानसभा निवडणूक दरम्यान राज्य सरकारने लाडक्या बहीणीना २१०० रुपये महिन्याला देण्याचे आश्वासन दिले होते. राज्य शासनाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अपयशी ठरलेल्या धोरणांविरोधात रमी खेळणाऱ्या मंत्र्याला हटविण्यात यावे. औद्योगिक कंपणीमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्रधान्य देत रोजगार उपलब्ध करुन द्यावे. या अनेक मागण्यासह राज्य शासनाच्या विरोधात शिवसेना उबाठा तर्फे दि.२० ऑगस्ट रोजी भद्रावती येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हाप्रमुख कामगार सेना श्री. सुयोग भोयर यांनी केले.
मोर्चा दरम्यान शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या व जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चात माजी नगरसेवक नीलेश पाटील, माजी सभापती भास्कर ताजने, अशोक निगम, नितीन सातपुते, सुनील पडोळे, बाळकृष्ण गाडगे, बंडूजी उरकुडे, संदीप चाटपकार, शमा मानकर, सचिन नक्षीने, राजु खिरटकर,शेषराव रामटेके, पिंटू मारसकोल्हे, संजय गायकवाड, संतोष दास, सोहेल शेख, मुश्ताक भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला वर्गातून सौ. नीलिमा भोयर, सौ. शिवानी सरकार, सौ. ज्योती बावणे, डहाळे ताई, सातपुते ताई यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या