Ticker

6/recent/ticker-posts

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहिल्यानगर:-इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी तसेच वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी दिली आहे.

  बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह एम.ए., एम.एस्सी. अशा पदवीनंतरच्या पदव्युत्तर (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १७ ते २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 

  २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार असून, गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी ३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे.

  रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी १५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या