Ticker

6/recent/ticker-posts

नामांकित शाळेत इयत्ता ११ वीच्या प्रवेशापासून २२३ विद्यार्थी वंचित;तात्काळ प्रवेश देण्याची बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :- शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ मध्ये नामांकित शाळेत इयत्ता ११ वीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,मंगल वसावे,दिनेश वसावे,सायसिंग वसावे,रमेश वसावे,निमजी वसावे,दिल्या वसावे,शिमल्या वसावे,खुमानसिंग वसावे, केल्ला वसावे,ईश्वर वसावे,बाज्या वसावे,सत्या वसावे,प्रविण वसावे,पाश्या वसावे, गणेश वसावे,कालूसिंग वसावे,दित्या वसावे,सिंगा वसावे,भिका वसावे,सोन्या वसावे,रणजित वसावे,जयश्री वसावे,गुलाबसिंग वसावे इत्यादी ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                          शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देणे ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षणाची जबाबदारी व पालकत्व आदिवासी विकास विभागाकडून स्वीकारण्यात आले आहे.शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसुत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
                              त्यानुसार प्रकल्प कार्यक्षेत्रातील के. डी. गावीत इंग्लीश मिडीयम स्कूल पथराई ता. जि. नंदुरबार ,एस.ए. मिशन इंग्लीश मिडीयम स्कूल नंदुरबार ता.जि. नंदुरबार , एस.ए. मिशन इंग्लीश मिडीयम स्कूल शहादा ता. शहादा जि. नंदुरबार , आत्मा मालीक इंग्लीश मिडीयम स्कुल गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज पुरणगाव ता. येवला जि. नाशिक ,त्रिमुर्ती पब्लीक स्कुल नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर या शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीत २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार असल्याकारणाने तिसऱ्या फेरीअंती एकूण ६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. उर्वरीत २२३ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.  ज्ञानेश्वर इंटरनॅशनल पब्लीक स्कुल (CBSC) भानसहिवरे ता. नेवासा या शाळेतील १९ विद्यार्थी नापास झाले होते. त्यांनी जुलै महिन्यात पुर्नपरिक्षा दिली, पंरतु अद्याप निकाल लागलेला नाही. इयत्ता ११ वीत प्रवेशाबाबत पालक वारंवार कार्यालयास विचारणा करतात. तरी नामांकित शाळेतील इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता ११ वी प्रवेशा बाबत मार्गदर्शन व  योग्य ते आदेश प्राप्त व्हावेत, जेणेकरून नामांकित योजनेतील एकही विद्यार्थी ११ वी प्रवेशापासून वचित राहून विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही,याची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या