चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-कु संबोधी शंकर गोडघाटे मु शिवनगर वर्धा या विद्यार्थिनीचा आय आय आय टी कॉलेज कर्नाटक धारवड येथेJEE मधून BTec करिता नंबर लागलेला आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 23 ऑगस्ट ही आहे. तिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिला प्रवेशाकरिता पैशाची अत्यंत गरज होती ही बाब समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थूल यांना समजली त्यांनी लगेच सुरेश वैद्य या सामाजिक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संबोधी यांच्या घरी भेट दिली आणि तिची संपूर्ण चौकशी केली आणि आपली सामाजिक बांधिलकी समजून त्यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्व दानदात्यांना मदतीचे आवाहन केले असता तीन दिवसांमध्ये 57003₹(सत्तावन हजार तीन रुपये )जमा झाले व संबोधीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी सहा वाजता संबोधीच्या घरी जाऊन तिची प्रत्यक्ष भेट घेऊन तिचा सत्कार करण्यात आला व गोळा निधी तिला देण्यात आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैद्य, सुनील ढाले, गौतम पाटील सुभाष गायकवाड,के बी थूल,महेंद्र बनसोड व तिच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते राजू थुल
0 टिप्पण्या