Ticker

6/recent/ticker-posts

अन्नधान्याच्या योजनेतुन बाहेर पडा " तहसिलदार श्री धनंजय देशमुख यांचे आवाहन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखणी :-राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यातील अंत्योदय योजनेचे 8237 शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब योजनेचे 83521 लाभाथी यांना दरमहा शासनाकडून धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानामधून करण्यांत येतो, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका दरमहा 10 किलो गहू व 25 किलो तांदूळ मोफत तसेच प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती। किलो गहू व 4 किलो तांदूळ मोफत देण्यांत येत आहे.

वरील लाभार्थ्यांपैकी जे लाभार्थी शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये असेल किंवा ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे चारचाकी वाहन असेल किंवा लाभार्थी आयकर भरत असेल किंवा जे कुटुंब आर्थिक परिस्थितीने सधन असेल, अशा शिधापत्रिकाधारकांना स्वतःहून तहसिल कार्यालय, लाखनी येथे अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा" या योजनेचे फॉर्म भरून द्यावे. जेणेकरून आपल्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांचा समावेश करून त्यांना धान्याचा लाभ देण्यांत येईल.

तरी सर्व शिधापत्रिका धारकांना याद्वारे आवाहन करण्यांत येते की, या योजनेचा लाभाथ्यांनी लाभघेवून शासनास सहकार्य करावे. याबाबत कुणाला अडचण असल्यास त्यांनी तहसिल कार्यालय, लाखनी येथील पुरवठा शाखेमध्ये श्री रोशन कापसे, निरीक्षण अधिकारी किंवा श्री विनय कच्छवाय, पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन लाखनी तालुकाचे तहसिलदार श्री धनंजय देशमुख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या