Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यात लक्ष्मी मुक्ती योजनेची सुरुवात!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी -  तालुक्यांमध्ये लक्ष्मी मुक्ती योजना... ही योजना पूर्णतः निशुल्क आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक सातबारा खातेदार आपल्या पत्नीची नोंद मोफत करण्याची सोय करण्यात आली आहे.


महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा राबवण्यात येत या पंधरवड्यामध्ये वशिष्ठ पूर्ण कार्यक्रमा ंमध्ये लक्ष्मी मुक्ती योजने चा सहभाग करण्यात आलेला यामुळे लक्ष्मी मुक्ती योजनेची माहिती पुढील प्रमाणे या योजनेचे परिपत्रक 1992 ला काढण्यात आले होते अशा प्रकारे ही योजना 33 वर्ष जुनी परंतु काही कारणाने दुर्लक्षित राहिलेली व महत्त्वाची योजना लक्ष्मी मुक्ती योजना आता सक्षमतेने लाखनी तालुक्यात राबविण्यात येणार आहेत.

लक्ष्मी मुक्ती योजनेचे तीन हजार पेक्षा जास्त फॉर्म छापून घेतले आहे व ते तहसील ऑफिस मध्ये व तलाठी ऑफिस मध्ये मोफत उपलब्ध फॉर्म सोबतच एक स्वयं प्रतिज्ञापत्र व शपथपत्र आहे त्यामध्ये ज्या महिलेला लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये सामील व्हायचे किंवा करायचे आहे पतीने हे शपथपत्र द्यायचे आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेनुसार, पतीच्या नावावर 

असलेल्या शेतजमिनीवर पत्नीला सह-मालकी हक्क मिळणार आहे. यामुळे महिलांना केवळ आर्थिक सुरक्षाच मिळणार नाही, तर समाजात त्यांना अधिक सन्मान मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पतीला तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, जसे की पती-पत्नीचे आधार कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि सातबारा उतारा.
ही योजना महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेमुळे महिलांना शेतीशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
यामध्ये लाखनी तालुक्यामध्ये 7500 पेक्षा जास्त वैयक्तिक खातेदार आहे त्यांच्या याद्या ग्रामपंचायत मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत व खातेदारांना वैयक्तिकरित्या सभांमध्ये देखील लक्ष्मी मुक्ती योजनेबाबत सांगण्यात येत आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाखनी तालुक्यामध्ये सर्व वैयक्तिक सातबारा धारक यांनी तात्काळ तलाठी कार्यालयात भेट द्यावी व आपल्या पत्नीचे नाव सातबारावर संलग्नित करावे, अशी माहिती लाखनीचे तहसीलदार धंनजय देशमुखयांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या