चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच गिरी गोसावी मठ,मंदिर स्थळांना भेट देऊन पाहणी केली.मंदिर शिखरावर व जागोजागी झाडांची मुळे खोलवर रुतली असून मंदिर व छतत्र्यांच्या स्वरूपाला हानी पोहोचू नये व ती मुळे नष्ट कशी करता येईल आणि मंदिर व स्मारक छतत्र्यांची डागडुजी ई बाबत पाहणी करण्यात आली.पुणे येथून आलेले वास्तू विशारद रंजीत पाटील यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन केले . या प्रसंगी आर्किटेक्ट इंजिनिअर शरयू मोरे(,मुंबई),पुरातत्व विभागाच्या उप_अवेक्षक साक्षी बोंधाटे,देवेंद्र बोकडे (नागपूर)ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर गिरी,सचिव सईद शेख,कंत्राटदार विलास देशमुख, इसाक शेख(नागपूर),यश देशमुख, ई उपस्थित होते.
मंदिर व स्मारक, छत्र्यांची स्वच्छता,जतन,सौंदर्यीकरण च्या कामाकरीता शासन कडून दिडकोटी रू.ची तरतूद करण्यात आली असून लवकरच ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या