Ticker

6/recent/ticker-posts

प्रज्योततात्या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त काढणार -अध्यक्ष सागर उरवणे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक ही डीजे मुक्त काढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सागर उरवणे यांनी सांगितले. 
डीजे आणि लेझर मुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांसह सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे मंडळाने डीजे व लेझर मुक्त मिरवणूक काढण्याचे ठरविले आहे  6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणूक ढोल ताशांसह हलग्यांच्या कडकडाटात व टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात येणार असून मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या