चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-१२ सप्टेंबर पासून सतत पावसाची बॅटींग चालूच होती.म्हणुन खरीप हंगाम पाण्यात गेल्याने नुकसान भरपाईसाठी पंचनामा व ई-पीक पाहणी करण्याचे शासनादेश आहेत. म्हणुन प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने हे करत होता.पण दि.२६,२७ सप्टेंबर रोजी पावसाने असा कांही धुमाकूळ घातला की पीके पाण्यातच फसले.तरीही शासन सरसकट न देता पंचनामा व ई-पीक पाहणी करा असे फर्माण सोडतच असल्यामुळे शेतक-यांचा संयम सुटत चालला आहे.स्व:तासाठी वाढीव मानधन व कुटूंबियांसाठी सुखसुविधा वाढवून घेण्यासाठी अट,बीट न ठेवणा-यांनी शेतक-यांसाठीच अट का ठेवली? एवढा मोठा पाऊस होऊन ही ओला दुष्काळ जाहीर का करत नाहीत? असे प्रश्न जनतेसह शेतक-यांमधून विचारले जात असून ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट भरपाई द्या हो.असा टाहो हंडरगुळी परिसरातील शेतकरी फोडत आहेत.
या भागात बहूतांश पेरण्या जुन मध्ये झाल्या असून आॅगस्ट मधील मोठा पाऊस मुग,उडीद घेऊन गेला.आणि आता नगदी काढणीला आलेले सोयाबीन सप्टेंबर मधील मुसळधार पावसाने घेऊन गेले.म्हणुन शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.तरी मायबाप शासनाला शेतकरी जगावा असे वाटत असेल तर सरसकट पीक विमा आणि अतिव्रष्टीचे अनुदान देणे गरजेचे आहे.अन्यथा हंडरगुळी सह परिसरातील शेतकरी जगू शकणार नाहीत!शेती,त्यातील पीकं सगळं सगळ निर्सगाने धुवून-पुसून नेले. तवा आमी जगायचं कसं?अशी आर्त हाक शेतक-यांमधून ऐकायला येते. किती मोठे नुकसान झाले आहे.हे सर्व कांही डोळ्यापुढे असतानासुध्दा सरसकट ओला दुष्काळ जाहीर का करत नाहीत?शेतकरी मरावे आणि मगच ओला दुष्काळ जाहीर करावे, असे शासनाने ठरवले आहे का?असे प्रश्न संतप्त शेतक-यांमधून विचारले जातात.
एकीकडे दसरा,दिवाळी तोंडावर तर दुसरीकडे निर्सगाने तोंडचा घासच पळवल्याने शेतक-यांच्या आशा, आकांशा,स्वप्ने असे सारे कांही या पावसात वाहून गेले.तेंव्हा दिवाळी मध्ये होळी साजरी करायची वेळ आली आहे.
परवा पडलेल्या अतिमुसळधार पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले आणि येथील तिरु नदीला यंदा दोन वेळा भर"पूर"पाणी आल्याने या तिरु नदीने रौद्ररुप धारण केले होते.
सोयाबीन,ऊस यासह झेंडू व हळद आदी पिके पाण्यात...
हंडरगुळी परिसरातील शेतक-यांचा हुकमी एक्का असलेले सोयाबीन व ऊस तसेच हळद व झेंडूचा मळा परवाच्या पावसाने पाण्यात अडकून नेस्तनाबूत झाल्याचे चिञ हंडरगुळी परिसरात दिसून येत आहे. शेतक-यांचे कधीच भरुन न निघणारे नुकसान यंदा झाले असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी.
उमाकांत आयतलवाड,शेतकरी वंजरवाडी(हाळी)
बुट पाॅलीश,इस्ञी,दाढी,कटींग यांचे सह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले माञ,शेतीमालाचे दर कांही वाढलेले नाहीत.त्यात निर्सगाचा मारा.अशा दुहेरी,तिहेरी संकटात अडकलेल्या शेतक-यांना शासनाने मागचापुढचा विचार न करता सरसकट तत्काळ मदत दिली तरच शेतक-यांच्या घरी दसरा,दिवाळी साजरी होऊ शकते.
संग्राम बापूसाहेब भोसले,चेअरमन
हंडरगुळी..


0 टिप्पण्या