Ticker

6/recent/ticker-posts

मा. अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, मा. अरविंद रायबोले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांनी जागेवर येऊन पाहणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 

लातूर :-मौजे बेळसांगवी येथील आलेल्या पुरामुळे वेळ सांगवी ते जळकोट जाणाऱ्या रोडवरील पुलास झालेले नुकसानीचे पाहणी करून मा. अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, मा. अरविंद रायबोले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांनी जागेवर येऊन पाहणी करून आजच्या आज खचलेला पूल मध्ये भराव भरून वाहतुकीस अडचण येणार नाही याबाबत सूचना दिल्याने वाढवणा पोलीस स्टेशन येथील इन्चार्ज सुनील गायकवाड साहेब, बीट अंमलदार तुकाराम बळदे,संजय कलकते यांनी बेळसांगवी येथील यशवंत प्रतिष्ठान तर्फे यशवंत  नकुरे पाटील व संतोष  बिरादार भोपणीकर व गावातील प्रतिष्ठित लोकांचे सहाय्याने सदर पुलाचे भराव पूर्ण करून वाहतूक सुरळीत केलेली आहे. गावातील लोकांनी मा.पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेबांचे पुलाचे दुरुस्तीचे काम तसेच रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या