चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचे राजू डोंगे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी सभापती पदी निवड होण्यास भाजपचे जेष्ठ नेते अशोकभाऊ जिवतोडे, विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी उपाध्यक्ष संतोष आमने, कृउबास भद्रावती माजी सभापती वासुदेव ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष विजय वानखेडे,भद्रावती तालुका ग्रामिण श्यामसुंदर उरकुडे, दयानंद जांभुळे यांचा सहभाग होता. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती उपसभापती अश्लेषा मंगेश भोयर तथा सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थित कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती राजू डोंगे यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या