चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-गत कित्येक वर्षापासून छञपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य असा पुतळा असावा.अशी हंडरगुळी ता.उदगीर येथील शिवभक्तांची तीव्र इच्छा होती.आणि आता ही इच्छा १७ सप्टेंबर २५ रोजी पुर्ण होणार आणि पालकमंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते छञपतीच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन आहे.अशी माहिती सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी भोसले यांनी दिली.
दि.६ रोजी पुणे येथून नवीन पुतळा हंडरगुळी नगरीत सकाळी.९.३० वा. आणण्यात आला.यावेळी सर्व धर्मातील १८ पगड जातीच्या हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत विधिवत पुजा करुन छञपतींच्या नवीन पुर्णाक्रती उभ्या पुतळ्याची बाजार पेठेतील चौकात जेसीबीच्या साह्याने उभारणी केली. हंडरगुळी येथे छञपतींचा पुतळा होता.तो खुप वर्षापुर्वी बसवलेला, म्हणुन भव्यदिव्य उभा असलेला नवीन पुतळा असावा.अशी मनोमन इच्छा शिवप्रेमींची होती.आणि ही इच्छा पुर्ण करण्यासाठी उपसरपंच बालाजी भोसले यांनी आपले वजन आमदार व प्रशासनस्तरावर वापरले आणि आमदार फंड तसेच लोकवाटा मिळवून शिवरायांचा भव्यदिव्य उभा असलेला व भगव्या वस्ञाने बांधलेला पुतळा (दि.६ला)बसविला.
यावेळी पुणे येथून पुतळा घेऊन येणारे वाहन येताच बसस्थानक ते छञपती शिवाजी चौकापर्यंत ढोलताशा व जयभवानी,जयशिवाजी च्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि हाळी,सुकणी, मोरतळवाडी,आनंदवाडी,रुद्रवाडी, खरबवाडी येथील हजारो सर्वधर्मीय नागरीक व शिवप्रेमी यांच्या उपस्थि तीमध्ये नवीन पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.
दि.१७ रोजी पालकमंञी महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण करायचे नियोजन सुरु आहे.माझ्या सरपंच पदाच्या काळात भव्यदिव्यस्वरुपाचा पुतळा हंडरगुळी नगरीत उभा करुन जनतेची इच्छा पुर्ण केल्याने मला समाधान वाटत आहे.तसेच समस्त जनता व शिवप्रेमींपण समाधानी आहेत.असे विजय अंबेकर सरपंच,हंडरगुळी यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या