Ticker

6/recent/ticker-posts

महापालिके मार्फत गणेशोत्सवात २५ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | २३.५८६ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:- यंदाच्या गणेश उत्सवात नांदेडकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव नांदेडकरातर्फे साजरा केला जात आहे. विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवात २३.५८६ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात ९ हजाराहून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. तर एकूण २५ हजार ९५२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशी माहिती *महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी दिली.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे,होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात आली होती. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व नागरिकांना केले होते.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय
करण्यात आली होती.

• पालिकेच्या ०६ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २३ मूर्ती संकलन केंद्रामध्ये मध्ये एकूण ८५३६ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

• नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात आली होती.

• क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी १४ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आल्याने एकूण २३.५८६ मेट्रिक टन इतके निर्माल्य संकलन झाले.

• सर्व मूर्ती संकलन केंद्रावरील गणेश मूर्ती एकत्रित करून वाहतूक करण्यासाठी एकूण ३५ आयचर वाहने नियुक्त करण्यात आली होती त्याचप्रमाणे मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एकूण २१ मोठ्या क्रेन स्थापित करण्यात आल्या होत्या.

• प्रत्येक विसर्जन घाटावर आवश्यक ती विद्युत रोषणाई व जीव रक्षकांची टीम तैनात करण्यात आली होती.

गोदावरी व आसना नदीतील पाणी प्रदुषीत होऊ नये व जलसंपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण पुरक कृत्रिम तलावात लहान व मध्यम आकाराचे श्री गणेश मूर्ती आणि दोन्ही खदान तलावात मोठे श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करुन, पर्यावरणपुरक गणेशोत्सव पार पाडण्यात आला आहे. सदरील विसर्जन व्यवस्था महापालिका आयुक्त आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखालील उपआयुक्त निलेश सुंकेवार,नितीन गाढवे, सुप्रिया टवलारे, अजितपालसिंघ संधु यांच्या नियंत्रणात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन गणेश विसर्जन उत्सव शांततेत पार पाडला आहे.
*(टीप :- सदरील आकडेवारी ही रात्री ९.०० वाजे पर्यंतची असुन यामध्ये वाढ होऊ शकते)*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या