Ticker

6/recent/ticker-posts

आनंदाचा शिधाच नाही,तर दिवाळीचा आनंद घ्यायचा कसा ?


हंडरगुळी परिसरातील लाभधारकांचा सवाल
 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-सण,उत्सवांदरम्यान राज्यात राशन दुकाणातून आनंदाचा शिधा नावाने १०० रुपयात रवा,मैदा,दाळ,साखर, तेल व पोहे या वस्तू मुख्यमंञी असताना एकनाथ शिंदे यांनी गरजू लाभधारकांना द्यायला सुरुवात केली होती.म्हणुन लाभार्थ्यांमध्ये आनंद व शिंदे बद्दल आपुलकी निर्माण झाली होती.पण आनंद व आपुलकी कांही काळच टिकला.कारण,कालांतराने ही योजना शासनाने गुंडाळली.तसेच पुन्हा हा शिधा मिळेल याची गॅरंटी नाही.म्हणुन हंडरगुळी परिसरातील लाभधारकात नाराजी पसरली.तसेच या योजनेला पुर्नजिवन मिळण्याची शाश्वतीच नसल्याने दसरा व दिवाळी आनंदाचा शिधाविनाच संपन्न होणार का?तसेच हा शिधाच नसेल तर मग सणांचा आनंद घ्यायचा कसा?असे प्रश्न हंडरगुळी परिसरातील लाभार्थी वर्गातून विचारला जातोय.
तसेच या बद्दल कांही दुकाणदार व लाभार्थी पुरवठा विभागाकडे अधून, मधून चौकशी करतात.पण,शासनाचे अजून कोणतेच आदेश नाहीत.अशी माहिती तहसीलच्या पुरवठा विभागा कडून मिळाली आहे.तर गावखेड्या मध्ये ही योजना सुरु कधी होणार? असा प्रश्न प्रत्येक कोट्यागनीस कार्ड धारक विचारुन भंडावून सोडतात. अशी माहिती रेशन दुकाणदार देतात सा्वजनिक धान्य वितरण व्यवस्थे च्या माध्यमातून पुरवठा विभागाने सण,उत्सवांमध्ये कार्डधारकांना थोडा,फार दिलासा देण्यासाठी मा. मुख्यमंञी एकनाथ शिंदेंनी आनंदा चा शिधा ही योजना सुरु केली होती. व रामनवमी,दसरा,दिवाळी,गणपती या सारख्या सण,उत्सवात हा शिधा १०० रुपयांमध्ये देऊन सण,उत्सवां चा आनंद द्विगुनित होत होता.
परंतू,वर्षभरापासून ही योजना बंद करुन सण,उत्सवाच्या आनंदावर विरजण टाकले.म्हणुन हंडरगुळीसह परिसरातील लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली.व शिधाच नाही.तर मग सण व उत्सवांचा आनंद मिळणार कसा?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या