Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबाद मनपा निवडणूक: प्रभाग ३ मधून 'वंचित'च्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक ३ मधील चारही अधिकृत उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज (नामांकन) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.

वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग ३ मधून खालील उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे:

प्रभाग ०३ अ: अमित सुधाकर भुईगळ
प्रभाग ०३ ब: मो. जरीना मो. जावेद म. जावेद
प्रभाग ०३ क: करुणा देविदास वाघमारे
प्रभाग ०३ ड: अफसर खान यासीन खान

अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांसोबत वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या