Ticker

6/recent/ticker-posts

५० वर्षांचा वनवास संपला! वैदू समाजाचा पहिला नगरसेवक; दिलीप देशमुखांनी वाडीत रचला इतिहास


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड(कंधार) : राजकारणाच्या परिघाबाहेर राहिलेल्या भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वप्न नांदेडच्या सत्यात उतरले आहे. वाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप संतराम देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

 गेल्या ५० वर्षांतील वैदू समाजाचे पहिले नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवला आहे. "आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या भटक्या समाजातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून तिकीट दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने उपेक्षित समाजाला न्याय दिला आहे. असे दिलीप संतराम देशमुख म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या