Ticker

6/recent/ticker-posts

कबड्डीपटू मुलीच्या हत्या चे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुनावळे :-एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू
मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने
जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली
आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर.साळुंखे यांनी हा निकाल दिला. शुभम ऊर्फ ऋषिकेश
बाजीराव भागवत (वय २२) असे शिक्षा सुनावण्यात
आलेल्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या मुलीच्या चुलत
बहिणीने याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती 
पुण्यातील बिबवेवाडी भागात एका 15वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीची हत्या करण्यात आली होती. मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तब्बल २२ वार केले होते. नराधमाने भर मैदानात तिला गाठून तिचा गळा चिरला होता. या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या वकिलाने केली आहे. यावेळी १२ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. त्यांनी थरकाप उडवणारा घटनाक्रम कोर्टात सांगितला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या