चित्रा न्युज प्रतिनिधी
बार्शी/ बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र आणि युवा नेतृत्व श्री. रणवीर राऊत यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आज सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते रणवीर राऊत यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी केदार-सावंत यांनी रणवीर राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
रणवीर राऊत यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आल्याने बार्शीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात युवा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या