Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोलीत भाजपाची भव्य-दिव्य विजयी जल्लोष रॅली मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचा उत्स्फूर्त सहभाग..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिरोली:- नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करत नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्यासह तब्बल १५ नगरसेवक उमेदवार निवडून आणण्याचा ऐतिहासिक विजय मिळविला. या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात भाजपाच्या भव्य-दिव्य विजयी जल्लोष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या‌ विजयी जल्लोष रँलीच्या आनंदोत्सवात माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांनी जल्लोषात सहभागी होत नगराध्यक्षा व सर्व विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले. कार्यकर्त्यांच्या उत्साहात मिसळत, विजयाचा आनंद साजरा करत डॉ. नेते यांनी रॅलीत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

या विजयी रॅलीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, समन्वयक प्रमोद पिपरे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनगदलवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद, बँड-वाद्यांचे सूर आणि डीजेच्या तालावर उमटणाऱ्या "भाजपा जिंदाबाद” अशा गगनभेदी घोषणा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विजयाच्या या रॅलीने गडचिरोलीत भाजपाच्या संघटनात्मक बळाचे आणि जनतेच्या विश्वासाचे दर्शन घडविले.
ही विजयी रॅली म्हणजे केवळ आनंदोत्सव नव्हे, तर विकास, विश्वास आणि सेवाभावाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेली ठाम शिक्कामोर्तब असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या