Ticker

6/recent/ticker-posts

सहज सुचलं नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणारा गृप - सेवानिवृत्त प्रा.लता हिवरे

चित्रा न्युज प्रतिनिधी

चंद्रपूर -: सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप नवोदित कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणारा असून तो एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप आहे .या गृपची सदस्यगण संख्या  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका लता विलास हिवरे यांनी या प्रतिनिधीशी आज एका मुलाखती दरम्यान बोलताना दिली.
या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे तदवतचं अमरावतीच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, कवयित्री शैला चिमड्यालवार,व सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते या शिवाय मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापिका लता हिवरे म्हणाल्या.
याच गृपवर किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, मुंबईच्या नामवंत चित्रकार नूपुर मोडक, चंद्रपूरच्या आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, चित्रकार रश्मी पचारे आदिं कार्यरत आहेत.गृपवरील अनेक सदस्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या