Ticker

6/recent/ticker-posts

खा. प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत शेतकऱ्यांच्या विविध समस्या व शिक्षकांच्या हक्कांबाबतचे मुद्दे उपस्थित केले!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : दिल्लीमध्ये संसद भवन येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना राज्यातील काही महत्त्वपूर्ण विषय मी संसदेमध्ये खा. प्रतिभा धानोरकर यांनी मांडले.

शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या कापसावरील जाचक अटी रद्ध करण्यात याव्यात तसेच वर्ष 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  अजूनही कर्जमाफी मिळाली नाही; तसेच टीईटी परीक्षेची शिक्षकांवर लादलेली जाचक अट शिथील करण्यात यावी.यासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणींचे मोठे प्रकल्प शासनाकडून सुरू आहेत.यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या गेलेल्या  जमिनींमधील काही टक्के जमिनीवरील मोबदला शेतकऱ्यांना अजूनही मिळत नाही.हे आणि राज्यातील असे अनेक महत्वपूर्ण प्रश्न संसदेमध्ये मांडून समस्याग्रस्तांना योग्य  न्याय मिळावा ही मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या