चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : दि.१४ डिसेंबर २०२५ ला ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त. कोरपना जि. चंद्रपूर येथून बुद्धभूमीच्या दक्षिण पश्चिम बाजूस असलेल्या डोंगरावर निसर्ग सहल बैठकीचे आयोजन करण्यात आले.
याकरिता सर्व सहल सहभागी यांनी सकाळी ९:३० वाजेपर्यंत ऐतिहासिक बुद्धभूमी तेथे उपस्थित राहण्याचे सर्वांना कळविण्यात आले. त्यानुसार सर्व सहलार्थी कार्यकर्ते सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित झाले होते.
जोगाई पहाडाच्या पश्चिम दिशेला असलेल्या टोकावर अशोककुमार उमरे, शिवाजी धुपे, गजानन वाघमारे, नामदेव लांडगे, सचिन पिपरे विरूर स्टेशन, प्रविण ताकसांडे विरूर स्टेशन, अनैशा उपरे, सुरज उपरे, अशोक तुपसुंदर, दिनेश गायकवाड, मुन्ना मेश्राम, भिमदास गायकवाड, गौतम पथाडे इत्यादींनी भेट देण्यासाठी सहभाग घेतला.
या सहलीत चळवळीतील कार्यकर्ते सुरज उपरे यांनी कन्या आयु. अनैशा सुरज उपरे वय सहा वर्षे ही न थकता पुर्णवेळ पायदळ आणि पुर्ण उत्साहाने सहलीचा आनंद लुटत आमच्या सोबत होती.
बुद्धभूमी पासून अंदाजे दीड दोन किमी अंतरावर पश्चिम दिशेच्या टोकांवर असलेल्या स्थळाला भेट देण्याचे ठरविण्यात आले होते. सर्वजण पायदळ इच्छित स्थळवर जास्त वेळ लागला नाही. तिथे पोहचल्यावर पाहणी केली असता तिथे पुरातन काळ्या दगडाच्या चिरा, धम्मचक्र आणि एक सहसा पुरातन विहाराच्या दरवाज्याच्या दर्शनी भागावर कोरीव काम केलेल्या महिलेचे कोरीव शिल्प देविची मुर्ती म्हणून दिसून आली. ही मुर्ती सुद्धा इथेच पडलेली होती. असे वाटते.
याच जागी एक धम्मचक्र सुद्धा दिसून आले. धम्मचक्र हे विहाराच्या छतावर असते. त्या धम्मचक्राचा छत्रछायेखाली विहारात वावर करायचा असतो. मात्र येथील नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात दगडाचे कोरीव धम्मचक्र हे मुर्तीच्या सामोर जिथून पाय देऊन देवीच्या मंदिरात जाणाऱ्या भागात जमिनीवर बसविण्यात आले आहे. हे धम्मचक्र बसविणाऱ्यानी असे जमिनीवर लावायला नाही पाहिजे. हे चक्र अपमानित करून पायदळी तुडविण्यासाठी नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण आपल्या पवित्र आणि आदर्श वास्तू, प्रतीके यांच्याकडे दुर्लक्ष केले की मग ते जाणते अजाणतेपणी अज्ञानी तसेच विरोधकांच्या माध्यमातून ही प्रतिके पायदळी तुडविल्या जातात. आपली सुद्धा संवेदना मेल्यामुळे कोणी पायदळी तुडविले तरी आपणाला काहीच कसे वाटत नाही.
कोणतेही कोरीव शिल्प मुर्ती असो किंवा प्रतीके असो यांचा यथायोग्य सन्मान, संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे.
या मंदिराच्या डाव्या बाजूला दक्षिणेकडे दरवाजा असलेले हनुमान मंदिर नव्याने बांधण्यात आलेले दिसून आले. तसेच या मंदिराच्या उजव्या मागच्या बाजूला एक शेड उभारले जात आहे.
अंदाजे साडे चार- पाच वाजता परतीला निघालो. बुद्धभूमी येथे आल्यानंतर चळवळीवर झालेल्या चर्चेला एक सकारात्मक पाऊल म्हणून सहलीसाठी सहभागी झालेले आयु. भिमदास गायकवाड शिक्षक कढोली यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्राचे पुस्तक भेट देण्यात आले.
या सहलीच्या निमित्ताने सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा व चळवळीवर चर्चा करण्यात आल्या. आणखी लवकरच बहुतेक लोकांना अनभिज्ञ असलेले मौजा मुकदमगुडा तालुका जिवती येथील नवीन ऐतिहासिक स्थळांच्या सहल बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या