चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी:- जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याकरीता जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत केंद्र व राज्य शासनामार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व या योजनांच्या लाभांबाबत येणाऱ्या अडचणी, तसेच यूआयडी (युनिक आयडेंटिफिकेशन) कार्ड संदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
दिव्यांगांनी आपल्या समस्या, तक्रारी व सूचनांचे मुद्दे लेखी स्वरूपात सोबत आणावेत. या बैठकीस जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आर व्ही चाकोर यांनी केले आहे.


0 टिप्पण्या