चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक: राज्य सरकारमधील क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
१० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने, कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार आता त्यांच्यावर आहे.
नेमकी घटना काय?
शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिकांच्या वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड सुनावला होता.
न्यायालयाने त्यांनी केलेला अर्ज फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली आणि दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. न्यायालयाने कोकाटे बंधूंना कोणत्याही क्षणी अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या दोघेही पोलिसांच्या 'रडार'वर आहेत.


0 टिप्पण्या