Ticker

6/recent/ticker-posts

कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, शिंदेसेनेला अधिक जागा मिळण्याचा आरोप


चित्रा न्युज प्रतिनिधी 

कल्याण:-  कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून संताप व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युतीच्या चर्चेत पूर्वेला भाजपच्या अवघ्या सात जागा मिळाल्याची माहिती आल्यानंतर कार्यकर्ते संतापले. त्यांनी कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत "आमला युती नको" अशी मागणी केली आहे.

भाजपचे पदाधिकारी पश्चिमेकडील भागात आक्रमक झाले असून जागावाटपात शिंदेसेनेच्या वाट्याला अधिक जागा येण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत स्थानिक नेत्यांनी चर्चा केली असून, त्यांनी कार्यकर्त्यांना युतीतच लढण्याचे निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या