चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-प्रधानमंत्री (घरकुल) आवास योजना अंतर्गत मौजा अड्याळ, तहसील पवनी, जिल्हा भंडारा येथील 440 लाभार्थ्यांना रेती चा लाभ मिळालेला नाही. घरकुल करिता शासनाकडून 5 ब्रास रेती मोफत मिळत असते परंतु पाच_ सहा महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा लाभार्थी रेती पासून वंचित असल्याने घरकुल लाभार्थ्यांना घर काम करण्याकरिता खूप अडचण निर्माण होत आहे. या समस्यांच्या निराकरण करिता ग्रा. प .सदस्य सोहेल खान यांनी नुकतेच पंचायत समिती पवनी येथे भेट देऊन या विषयाबाबत माहिती मिळविलीअसता संपूर्ण लाभार्थ्याची यादी तहसील कार्यालय येथे पाठवण्यात आलेली आहे व पुढील कारवाई तहसील कार्यालय पवनी येथे होणार अशी माहिती मिळाली. लगेच तहसील कार्यालय पवनी येथे मा. किशोर राऊत नायब तहसीलदार पवनी साहेब यांच्या सोबत चर्चा केली असता माहिती मिळाली की जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून पवनी तहसीलकरिता सात रेती घाट नियुक्त झालेले आहेत त्या करिता शासन घरकुल लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व आधार कार्ड ला मोबाईल लिंक असलेला मोबाईल, गाडी क्रमांक, आयडी कार्ड घेऊन तहसील कार्यालय पवनी येथे भेट घ्यावी , कार्यालयाकडून पत्र देण्यात येईल ते पत्र रेतीघाट वर पाच ब्रास रेती देण्यात येईल आणि घाटवर प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांनी संबंधित कागदपत्र घेऊन तहसील कार्यालय पवनी येथे जाऊन या योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन विनंती ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान यांनी केले आहे.


0 टिप्पण्या