Ticker

6/recent/ticker-posts

गोपीवाडा येथे भव्य क्रीडा उत्सवाचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा:- जिल्ह्यातील गोपीवाडा येथे क्रीडा महोत्सव 2026 चे आयोजन 4 जानेवारी ला उत्साहात पार पडले. युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक शक्तीचा विकास होऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने, महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीज मारेगाव व कमांडो ग्रुप गोपीवाडा, यांच्या संयुक्त विद्यमाने या गोपीवाडा क्रीडा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले, यात युवकांसाठी 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग गोळा फेक तर युवतींसाठी 800 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग गोळा फेक,तर लहान मुला व मुलींकरता 400 मीटर रनिंग स्पर्धेचे समावेश करण्यात आले होते,.जिल्ह्यातील व परिसरातील युवकांनी  या क्रीडा महोत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. युवकांमध्ये प्रथम क्रमांक अनुप सुरेश आतीलकर गोपीवाडा, द्वितीय सतीश ऊके राजेदहेगाव, तृतीय श्रीकांत हटवार रामटेक, तर मुलींमध्ये क्रमशः प्रथम द्वितीय आणि तृतीय शितल कारेमोरे राजे दहेगाव, समीक्षा दिलीप वैद्य गोपीवाडा, राणू सार्वे गोपीवाडा तर लहान मुलांमध्ये क्रमश: रुद्र राजेंद्र बोंद्रे, आदेश सोपान झंझाळ, आर्या संजय धोत्रे तर लहान मुलींमध्ये जान्हवी गजानन शेंडे ,लक्ष्मी राजेंद्र कहालकर आणि मानसी संजय आगाशे यांनी क्रमांक पटकावले, या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती एमएमपीएल इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर टी नरसिम्हम मूर्ती, कमांडो ग्रुपचे संस्थापक चंद्रशेखर डोळस, पंचायत समिती सदस्य संजय बोंद्रे, सरपंच विनायक टांगले, उपसरपंच चांगो निंबार्ते, माजी उपसरपंच जयंत बुद्धे, एम एम पी एल चे मॅनेजर  राकेश वाघाये, भोलानाथ झंझाळ, ज्ञानेश्वर झंझाळ ,प्रहरी संस्थेचे अध्यक्ष योगेश गहाणे,  आदेश कानतोडे सैनिक निलेश भांबोडे,व सर्व संचालक मंडळ,  प्रहरी संस्था तसेच ग्रामस्थ व परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन आदेश कानतोडे तर संपूर्ण कार्यक्रमात मुख्य पर्यवेक्षक  कमांडो चंद्रशेखर डोळस यांनी काम पाहिले.या क्रीडा उत्सवामुळे परिसरातील युवकांमध्ये  व जनतेत मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या