Ticker

6/recent/ticker-posts

पतीपासून वेगळ्या राहत असलेल्या महिलेला पोलिसाकडून त्रास

परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
धाराशिव :-सन 2022 पासून पतीपासून वेगळी राहत असलेल्या एका महिलेला तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्रास दिल्याचा गंभीर आरोप धाराशिव येथील एका पोलिस कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महिला एकटी राहत असल्याची बाब लक्षात घेऊन संबंधित पोलिसाने तिच्याशी वारंवार संपर्क साधत दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
सदर प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या