पदग्रहण समारंभात नगराध्यक्षांसह नवनिर्वाचीत नगरसेवकांचा सत्कार!
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : दि.६-शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करु अशी ग्वाही काल सोमवारी मुल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांनी नगर परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पदग्रहण समारंभात बोलताना दिली.
ब-याच समस्या या शहरात आहे. याची मला जाणीव आहे.
त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करु अश्या त्या बोलताना पुढे म्हणाल्या.सोमवारी पार पडलेल्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याला मुल नगरपरिषदेचे गट नेते राकेश रत्नावार, नगरसेवक प्रशांत समर्थ, रंजना धारणे, नलिनी आडपवार, उज्वला कामडी, तुकाराम गुरनुले, नितीन गद्देवार,शालू शेरकी,रितीक गोयल, विलास कागदेलवार,राहुल प्रेमलवार, ललिता फूलझेले, सुशिला खोब्रागडे आदिं उपस्थित होते.
दरम्यान हा पदग्रहण सोहळा बघण्यासाठी शहरातील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
नगराध्यांक्षसह सर्व नगरसेवकांचा या वेळी नगरपरिषदेच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रशासकीय अधिकारी विनोद येनूरकर यांनी केले.


0 टिप्पण्या