यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्र नागपूर आणि युवाशक्ती फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वंचित दुर्लक्षित घटकातील युवकांना 145 पेक्षा जास्त कोर्समध्ये शिक्षण उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण भागातील युवकांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून येत्या 6 मार्चला नागपूर विभागातील सर्व बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालय, नागपूर व युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 350 च्या वर कंपन्यांमध्ये 11000 पेक्षा जास्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या रोजगार मेळाव्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तथा अन्य विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यातून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन विभागीय संचालक डॉ धनंजय वेळूकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
प्राधान्य उद्योग प्रकार : 1. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग 2. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स उद्योग 3. इंजीनियरिंग, CNC मशीनिंग, टूलरूम 4. फार्मा व केमिकल उद्योग 5. फूड प्रोसेसिंग व पॅकेजिंग.
उपलब्ध औद्योगिक क्षेत्र : 1. कोकण विभाग 2. नाशिक -सातपूर, अंबड, इगतपुरी. 3. पुणे- चाकण, तळेगाव, रांजणगाव 4. संभाजीनगर - वाळूज, शेंद्रा 5. कोल्हापूर- गोकळशिरगाव.
अप्रेंटिसशिप/ OJT प्रशिक्षण कालावधी 1 ते 2 वर्षे असून किमान विद्यावेतन व स्टायपेड मिळेल
या मेळाव्यापात्रता निकष : उमेदवार कमीतकमी 10 वी /12 वी उत्तीर्ण असावा . पदवी, पदविका किंवा व्यावसायिक कोर्स शिकणारे विद्यार्थी, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात काम करण्याची तयारी असावी. यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, 10 वी, 12 वी, पदवी/ पदविका गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो 5 नग ,बँक पासबुक /खाते विवरण, बायोडाटा, दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत रोजगार मेळाव्याचे ठिकाण राव बहादुर डी. लक्ष्मीनारायण बंगला, विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज परिसर, अमरावती रोड, रवी नगर, चौक नागपूर असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9422247295, 8459843576, 9403774636 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नागपूर येथे होत असलेल्या रोजगार सुवर्णसंधीचा लाभ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी तथा इतरही विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तथा चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तरुण युवक, युवती, विद्यार्थी तसेच गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालय नागपूर यांच्या मार्गदर्शनात विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती अभ्यास केंद्र 4227A मार्फत करण्यात येत आहे. नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी विवेकानंद महाविद्यालय परिसरात अभ्यास केंद्रात सह संयोजक आशिष दुपारे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या