Ticker

6/recent/ticker-posts

९ बाईकसह चार चोरटे जेरबंद

साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. 
           गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या पत्रकाराची व काही शिक्षकांच्या दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा चार युवा चोरट्यांसह ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्यात.
            या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा.  चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. 
______________________
• ह्या सापडल्या चोरीच्या दुचाकी - 

: आरोपींकडे सापडलेल्या स्प्लेंडर, प्लस, पल्सर, हिरो डिलक्स, पॅशन या ९ दुचाकीत एमएच ३५ एके ९१२३, एमएच ४९ बीएफ २४०८, एमएच ३६ एएफ ५५५०, एमएच ३६ एबी २९०९, एमएच ३६ एएन ०५८२, एमएच ३५ एडी ६४२३, एमएच ३५ एएल ७५५५, एमएच ४० एस ५९१५ आणि एक बिना क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर अश्या एकुण नागपूर, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील दुचाकी मिळून आल्या. 
______________________

• प्रतिक्रिया -

"आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" 
-- एम. पी. आचरेकर 
"पोलीस निरीक्षक" 
पोलीस ठाणे, कार्यालय साकोली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या