Ticker

6/recent/ticker-posts

शंकर पटावर जुगाराला अग्रस्थान


•पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष


खुशाल भुरे चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.):-सर्वोच्च न्यायालय यांनी बंदी उठवल्यापासून ग्रामीण संस्कृतीचा दर्शन घडविला जाणारा बैलांचा इनामी शंकर पट बैल जोडीची शर्यत लावून ग्रामीण भागात मोठ्या उत्सवात पार पडला जात असलातरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत शंकरपट आयोजित ठिकाणी बेकायदेशीरपणे उघड्यावर जुगाराचे धंदे चालत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, व्यापार म्हणून जुगारांच्या माध्यमातून मोठे पैशांचे व्यवहार होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाण्याऱ्या शंकर पटावर भरविला जाणारा जुगार गावातील आर्थिक स्थितीवर परिणाम करीत आहे.
               ग्रामीण भागात बळीराजा हा आपला शेतीचा हंगाम संपवून शंकर पट मनोरंजनाचे साधन म्हणून प्रत्येक गावात पट भरवित असतो पण शंकरपटाच्या वेळी बैलगाडा शर्यतींच्या ठिकाणी पट आयोजक जुगाराचे आक्काकडून प्रवेश फी वसुल करून जुगाराला अग्रस्थान देत असल्याने पोलीस विभागाला न जुमानता जुगाराचे आक्का झेंडा-मुंडा, चौरस,लक्की सेवन, कट पत्त्यांचे किंवा अन्य प्रकारचे जुगार चालवले जातात त्यामुळे या जुगारात शेतकरी आपली कष्टाची कमाई, शेतीचा नफा लावून "पैशांचा चुराडा" करतात त्यामुळे शेतीत कष्ट करणारा हवालदिल शेतकरी जुगार खेळाने रिकामा होत आहे.तसेच लहान वयातील बालक जुगाराकडे भटकला गेला असून गावकऱ्यांनी पोलीस विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे.तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत अशा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या जुगारावर पोलिसांनी छापे टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे.पूर्वीच्या तमाशा आणि जुगाराच्या संस्कृतीकडून आता अनेक ठिकाणी गावकरी जागरूक होऊन केवळ मनोरंजनासाठी आणि परंपरेसाठी शंकरपटाकडे वळत आहेत, तरीही काही ठिकाणी जुगार अद्याप सुरू असल्याने शंकरपट हे परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असले, तरी त्यामागील जुगाराची कीड ग्रामीण अर्थव्यवस्थेला कमकुवत करत असून पोलीस विभागाकडून कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या