Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य पदवीकाधर पशुवैद्यक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती मंजूषा म्हेत्रे यांची एकमुखी निवड ;या निवडीने सर्व स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- महाराष्ट्र राज्य पदविकाधर पशुवैद्यक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मंडळाच्या एकमुखी निर्णयानुसार जामखेड येथील रहिवाशी असणाऱ्या श्रीमती मंजुषा सखाराम म्हेत्रे यांची महाराष्ट्र राज्य पदविकाधर पशु वैद्दक संघटनेच्याअहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
     श्रीमती मंजुषा म्हेत्रे यांचा सामाजिक व संघटनात्मक कार्याचा चांगला अनुभव आणि सर्वांग हितासाठी असलेली त्यांची तळमळ पहाता हे राज्यअध्यक्ष तेजपाल मोरे, उपाध्यक्ष अक्षय नरके, सरचिटणीस रंजित तायडे यांच्या वतीने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
      निवडी नंतर सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत असतानाच आपण संघटनेचे ध्येय- धोरणे तळागाळातील सर्वांग बंधू-भगिनींपर्यंत पोहचवण्याचा तसेच त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंजुषा म्हेत्रे यांनी स्पष्ट करत संघटनेचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या