चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :- उदगीर ता. किसान शिक्षण प्रसारक मंडळ. उदगीर द्वारा संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी येथील १२ विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड चळवळीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण १२ पैकी वीर सावरकर पथकातील ८ स्काऊटस व जिजामाता पथकातील ४ गाईडसना भारत स्काऊट व गाईड संघटनेचा राज्यस्तरीय राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव होणार आहे. माने जीवन दत्ता, सुतार संघर्ष विलास, माने प्रेम गंगाराम, गायकवाड रोहीत दशरथ, कांबळे शिवम मच्छिंद्र, कांबळे सम्यक बालाजी, शेख मुज्जाफर मुक्तार, हेंगणे श्रेयस शिवसांब ,कारामुंगे तनुजा अरविंद, वाघमारे अस्मिता दिगांबर, खोडेवाड सानिका माधव, माने श्रुती गंगाराम यांची राज्यपुरस्कारासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे पर्यवेक्षक स्काऊट मास्टर सुगावे बालाजी चंद्रकांत व गाईडर सौ. कनकुरे एम. एम. यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव ज्ञानोबा पाटील,सचिव पांडूरंग तुळशीराम शिंदे, सहसचिव गिरी हिरागिर सिद्धगिर, पाटील गुंडेराव भाऊराव, झोडगे ज्ञानदेव रामभाऊ, रामराव नारायणराव एकंबे,क काकासाहेब गोविंदराव पाटील, भिमराव नरसिंगराव पाटील, महाराष्ट्र कर्नाटक एकीकरण समितीचे सचिव जिल्हा बिदर पृथ्वीराज अशोकराव पाटील,प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद आर.एम. व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.


0 टिप्पण्या