Ticker

6/recent/ticker-posts

निलागोंदी येथे तलावातील गाळ काढणे कामाला सुरूवात


•लाखनी तालुक्यात पहिलाच मजूर प्रधान काम

•काम सुरू झाल्याने शेकडो मजुरांना दिलासा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.)- तालुक्यातील निलागोंदी ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव गाळ काढणे ( गट क्रं २४२) कामाचे भुमिपूजन उपसरपंच महेश हटवार निलागोंदी यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य दिनेश उर्फ बंडू वंजारी,,स्मिता बन्सोड,,तांत्रिक अधिकारी अमरदिप शेंडे, रोजगार सहाय्यक खुशाल भुरे,ग्रा.पं. कर्मचारी विनायक शेंडे,पा.पु.कर्मचारी निलेश वंजारी, प्रथम मजूर दिलहर बन्सोड, दिलहर वरठे,यशवंत हटवार,सुभाष हटवार तसेच ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत (ता.२७ फेब्रुवारी) रोज शुक्रवारला  भूमिपूजन समारंभ पार पडला. तलावातील गाळ काढणे कामाला सुरुवात झाल्याने तलावाच्या पाण्याच्या पातळी वाढ होईल तसेच ग्रामिण भागातील हातावर पोट भरणाऱ्या गरीब कुटूंबातील मजुरांना, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना, प्राधान्य कुटुंबातील मजुरांना कामाची हमी मिळाल्याने कामाची मजुरी जमा होणार असल्याने कुटूंबाची उपजीविका भागविण्यासाठी अल्पशी मदत होणार आहे. तलावातील गाळ काढणे कामावर ६२० मजुरांनी कामाची मागणी केली असली तरी मजूर अनुउपस्थितमुळे सध्या कामावर उपस्थित २७५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.शासनाच्या मग्रारोहयो कायद्यानुसार मजुरांना १०० दिवसाचे काम मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून गावातील मजुरांना २०२५-२६ ह्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत निलागोंदीने रोजगार मिळावा या उदात्त हेतूने विविध कामाचे अंदाजपत्रक तयार केले असून मजुरांना "मागेल त्याला काम" हे ब्रीद समोर ठेऊन वर्षभर मजुरांना काम देण्याचा संकल्प ग्रामपंचायत निलागोंदीने केला आहे असे उपसरपंच महेश हटवार यांनी कळविले आहे. तसेच तांत्रिक अधिकारी अमरदीप शेंडे यांनी मजुरांना कामाबाबत मार्गदर्शन करून ई-मोजमाप पुस्तकात कामाच्या ठिकाणी नोंद केली जाणार असल्याचे समजावून सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या