Ticker

6/recent/ticker-posts

मासळा व पावणा वनविभागातील अवैध रेती उत्खन्न करणाऱ्या वाहनांवर कारवाई.

भद्रावती वनविभागाने दोन ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून वाहन चालकांवर कारवाई.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील वनपरिक्षेत्रातील मासळ व पावणा नियतक्षेत्रात अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वनविभागाने कारवाई करून दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केल्या आहेत. हि कारवाई मंगळवार दि. ०३ फ्रेब्रुवारला सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती पेवरा मधील सदस्यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 
विभागीय वन अधिकारी के. डब्ल्यू धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शासकीय राखीव वनातील कक्ष क्रमांक २१९ नियतक्षेत्र मासळ व कक्ष क्रमांक ९ नियतक्षेत्र पावणा येथील नाल्यातुन अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक सुरु असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले. यावेळी दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आले. वाहन चालकांकडे वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे संबंधित वाहन चालका विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी व्ही. आर. ठाकरे, ए. बी. शेळकी, एस. आर. कुळमेथे, बी. के. परचाके, एस. एस. पारवे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी, पवन मांढरे, नितीन राऊत, अमरदीप कोल्हे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या