चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : महाशिवरात्री निमित्त मूल तालुक्यातील जानाळा येथील भूतेश्वर महादेव मंदिरात सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली होती.
या पुरातन मंदिरात चंद्रपूर ,मूल , सिंदेवाही, भंडारा व नागपूर येथील अनेक भक्तगण पुजा अर्चना करण्यासाठी व दर्शनार्थ आले होते.
चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश ददगाल , समाजसेविका मायाताई कोसरे , दत्तात्रय समर्थ,अर्चना दत्तात्रय समर्थ, राजू बघेल, सुधा बघेल, गणेश बघेल,श्रीमती वर्षा कारेंगवर कविता विनोद सदफळे, आनंदा कामडे, शिवानी सदाफळे,प्रांजू मखरे यांनी देखील भूतेश्वर महादेव मंदिरात सकाळी येवून पूजा अर्चना केली.


0 टिप्पण्या