चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी :- तालुक्यातील निलागोंदी येथे सण १९६० व्या वर्षांपासून बैलांचा शंकरपट भरविला जातो. आजही परंपरा गावाने अखंडपणे जपली आहे. निलागोंदी हे गावाची शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात असततरी निलागोंदी गाव वनव्यात परिसरात वसलेले असल्याने वन समृध्दी ह्या गावचे वैभव असल्यामुळे त्यावेळी जंगलाने व्यापलेल्या निलागोंदी गावाची अर्थव्यवस्था वन व्यवसाय,वनमजुरीवर अवलंबून असल्याने निलागोंदी गावातील लोक आर्थिक देवाण घेवाण याच भरवशावर करत असत. पण गावाशेजारील आजूबाजूला बैलांचा पट भरत असतांना आपल्या गावातही पट भरविता आला पाहिजे म्हणून स्व. बुधाजी भोयर यांनी बैलांच्या शंकर पटाची कल्पना मनात आणून स्व. महादेव वंजारी, स्व. श्रीराम हटवार, स्व.रामजी हटवार, स्व.मिताराम हटवार, स्व.दुधराम हटवार, तसेच इतर गावकऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून पटाचे मैदान तयार करण्यात आले होते त्यावेळी वसंत ऋतूत ०३ व ०४ फेब्रुवारीला सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने तारीख प्रसिद्ध करून शंकर पटाची मुहूर्तमेढ रोवली याच तारीखची आठवण राहावी, म्हणून येथील शंकर पटाची परंपरा नवीन पिढीने आजही जपून ठेवली आहे. शंकरपटात सुरुवातीला विजयी झालेल्या जोड्या हाकणाऱ्यांना बक्षीस म्हणून तिरंगा झेंडा दिला जायचा. बैलांची वेसण स्वरूपात बक्षीस दिली जात होती. त्यानंतर ही प्रथा बदलत गेली. बैलांची वेसण, बैलांच्या झुली, गृहपयोगी साहित्य असे बक्षिसांचे स्वरूप होते. आता बदलत्या काळात रोख रकमेचे बक्षीस दिले जाते. आता हा शंकरपट निलागोंदी गावाच्या हद्दीत झुडपी जंगलाच्या जागेत मागील ६६ वर्षांपासून अखंडपणे भरत आहे. नव्या पिढीने शंकर पट भरवण्याची परंपरा खंडित होऊ दिली नाही. शंकरपटाच्या निमित्ताने आताही शंकरपटाच्या दिवशी ०३ व ०४ फेब्रुवारीला दोन दिवस निलागोंदी गावाला जत्रेचे स्वरूप येत होते.पण काही कारणास्तव गावोगावी पटाचे विस्तारीकरण झाल्याने तीन दिवसीय पटाचे आयोजन करण्यात आले असलेतरी शंकरपट बघण्यासाठी परिसरातील पटशौकीन निलागोंदी येथे गर्दी करत असून या गावचे पटाचे मैदान प्रेषकांना आकर्षित करत असल्याने दूरवरून बैलजोड्या घेऊन कास्तकार येथे सहभागी होतात. मनोरंजनासाठी रात्रभर नाटक, गोंधळ, तमाशा, लावणी अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. बाहेरगावाहून आलेली पाहुणे मंडळी कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतात. निलागोंदी गावात तीन दिवस गावात उत्सवच असतो म्हणून आज तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या निलागोंदी गावाची जिल्ह्यात पटाची निलागोंदी असी ओळख प्राप्त झाली आहे.


0 टिप्पण्या