Ticker

6/recent/ticker-posts

निसर्ग अधिवासात बिबट्याची सुटका


दिघोरी-नान्होरी शिवारात बिबट्या जेरबंद


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):-लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र रामपुरी येथील मौजा  दिघोरी- नान्होरी येथील गावलगत शेत शिवारात वन्यप्राणी बिबट असल्याची माहिती (ता.१५ फेब्रुवारी) रोज रविवारला दुपारच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.नितेश धनविजय, लाखनी हे आपल्या अधिनस्त वनरक्षक व वनकर्मचा-यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक जमलेल्या नागरिकांना वन्यप्राणी संघर्षापासून हानी होवु नये, याकरीता योग्य सुचना देऊन तसेच सदर बचाव कार्याबाबतची माहिती उपवनसंरक्षक, भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, सं व अ.नि.), साकोली व पोलीस निरीक्षक, लाखनी यांना देण्यात आली.त्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राणी बिबट यांना जेरबंद करण्याकरीता वन्यप्राणी बचाव दल (शिघ्र कृति दल) भंडारा या चमुस घटनास्थळी पाचारण करण्यात आले घटनास्थळाची पहाणी करुन वन्यप्राणी बिबट याने मानव अधिवास क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्याचे निर्णय घेतले.घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी विठ्ठल हटवार कनेरी, यांनी बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्याचे औषध तयार केल्यानंतर आरआरटी टीम चे शार्प शुटर श्री.अनिल शेळके यांनी बिबटास डार्ट मारून बेशुद्ध करून बिबट्यास जेरबंद करण्यात आले.
पशु वैद्यकीय अधिकारी श्री. विठ्ठल हटवार यांनी वैद्यकीय तपासणी नंतर जेरबंद करण्यात आलेला बिबट हा शारीरीक दृष्ट्या सृदृढ असल्याचे अहवाल दिल्याने सदर बिबटास निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.सदर बचाव कारवाई  मा.योगेंद्र सिंग, उपवनसंरक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय मेंढे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, सं व अ.नि.) साकोली, श्री. सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) भंडारा, श्री.सुभाष बारसे पोलीस निरीक्षक लाखनी,  श्री.नितेश धनविजय वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी, श्री. शुभम मोदनकर जिवशास्त्रज्ञ, वनपाल लाखनी, श्री.जितेंद्र बघेले, वनरक्षक श्री.अजय उपाध्ये, श्री.  तुकाराम डावखोरे, श्री. बालाजी कदम,वाहन चालक श्री.अनिल शेळके, व RRT टीम चे सदस्य श्री. शशांक तुरस्कर, श्री.निशी वानखेडे,श्री.अविनाश नागपुरे ,श्री.नरेंद्र उर्कुडकर यांनी बचाव कार्यात सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या