चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-ज्येष्ठांचा उत्साह, जोश, साहस,व्यर्थ व वाया न जाऊ देता सहली च्या माध्यमातून निसर्ग,,पर्यावरण, आध्यात्म. इत्यादी शी जवळीक साधून साक्षात रूपाने निसर्गाचा आनंद न्याहाळला यावा या उद्देशाने स्थानिक अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा च्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले. सर्व पदाधिकारी, सदस्य 19 जानेवारी 26 रोजी सकाळी 8.30 वा.श्री चिंतामणी गणेश मंदिर खात रोड भंडारा येथे जमले आणि नाश्ता करून बसने सहलीला निघाले. जंगलांतील थंड, थंड वारा,संगीत मैफल गाजवत सर्वांनी भरपूर आनंद लुटला.
सहली दरम्यान हिरवेगार जंगल पार करीत भीमसेन टेकड्यांच्या कुशीत वसलेले डोंगर महादेव नेरला येथे पोहोचून पायथ्याशी जीवनदास महाराज व अवलिया बाबाची समाधी चे दर्शन घेत वर दीडशे पायर्या चढून भोलेनाथ व कार्तिकेय भगवान चे दर्शन घेतले. येथील ऊंच पहाडावर न आटत असलेली आयुर्वेदिक पाण्याने भरलेली विहीर पाहावयास मिळाली. सोबत मंदिर चे उपाध्यक्ष श्री गिरी महाराज हे होते. तिथून अडय़ाळ जवळ 3 की. मी.अंतरावर भीमसेन टेकड्यांनी वेढलेल्या भिवंखिड़की जलाशय ला भेट देवून सर्वांनी मनसोक्तपणे आनंद लुटला .तिथून अडय़ाळ येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चकारा येथे भगवान बालाजी मंदिर येथे भेट दिली. जलाशय काठी असलेल्या या रमणीय स्थळी पर्यटनाचा भरपूर आनंद लुटला व भुकेने व्याकूळ सर्वांनी खमंग जेवणावर ताव मारला,आस्वाद घेतला.गीत, संगीताने भरपूर जमलेल्या मैफिलीचा ही सर्वांनी गीत,भजन इत्यादि चा पूरे _पूर आनंद घेतला. नंतर इथून चकारा _चिचाल मार्गे गोसीखुर्द डॅम येथे पोहोचून चहा घेत सूर्यास्त च्या सुंदर दृश्याचा आनंद लुटत सायंकाळी गोसीखुर्द येथून परतीचा प्रवास सुरु करुन आनंद व उत्साहत भंडारा येथे सुखरूप पोहोचले.
सहलीला सर्वश्री विष्णुपंत पंडे ,रविन्द्र तायडे,चंद्रशेखर साठे, अविनाश पनके ,प्रकाश कुरोडे ,सौ प्रभा ढोके ,सौ नीलिमा साठे, सौ.जयश्री सातोकर ,सौ पनवेलकर ,सौ दीप्ती कुरोड़े ,सौ छाया कावळे, नितीन काकडे, चारुदत्त चौधरी(विदर्भ प्रांत सचिव),संजय आयलवार,संजय सातोकर,ब्राह्मणकर, डॉ रविन्द्र टामने,रमेश पारधी, अनंत कावळे ,सौ कल्पना पनके,अनिल शेंडे, धनराज,ढोके, सौ शारदा शेंडे, सौ डॉ.सीमा तायडे ,सौ.रूना राजेश पांडे, सौ.श्यामला टामने,सौ सोनाली पारधी, सौ करुणा चांदे इ. चा समावेश होता.
मा. जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर कुशीत वसलेले डोंगर महादेव नेरला येथे पोहोचून पायथ्याशी जीवनदास महाराज व अवलिया बाबाची समाधी चे दर्शन घेत वर दीडशे पायर्या चढून भोलेनाथ व कार्तिकेय भगवान चे दर्शन घेतले. येथील ऊंच पहाडावर न आटत असलेली विहीर आयुर्वेदिक पाण्याने भरलेली पाहावयास मिळाली. सोबत मंदिर चे उपाध्यक्ष श्री गिरी महाराज हे होते. काही अंतरावर असलेल्या भीमसेन टेकड्यांनी वेढलेल्या भिवंखिड़की जलाशय ला भेट देवून सर्वांनी मनसोक्तपणे आनंद लुटला .तिथून अडय़ाळ येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चकारा येथे भगवान बालाजी मंदिर येथे भेट दिली. जलाशय काठी असलेल्या या रमणीय स्थळी पर्यटनाचा भरपूर आनंद लुटला व भुकेने व्याकूळ सर्वांनी खमंग रुचकर जेवणावर ताव मारला,आस्वाद घेतला.गीत, संगीताने भरपूर जमलेल्या मैफिलीचा ही आनंद घेतला. नंतर इथून चकारा _चिचाल मार्गे गोसीखुर्द डॅम येथे पोहोचून चहा घेत सूर्यास्त च्या सुंदर दृश्याचा आनंद घेतला आणि सायंकाळी गोसीखुर्द येथून परतीचा प्रवास सुरु करुन आनंद व उत्साहत भंडारा येथे सुखरूप पोहोचले.
सहलीला सर्वश्री विष्णुपंत पंडे ,रविन्द्र तायडे,चंद्रशेखर साठे, अविनाश पनके ,प्रकाश कुरोडे ,सौ प्रभा ढोके ,सौ नीलिमा साठे, सौ.जयश्री सातोकर ,सौ. मंजिरी पनवेलकर ,सौ दीप्ती कुरोड़े ,सौ. छाया कावळे,श्री नितीन काकडे, श्री चारुदत्त चौधरी(विदर्भ प्रांत सचिव) श्री संजय आयलवार, श्री संजय सातोकर, सौ. सुनीता ब्राह्मणकर,श्री डॉ रविन्द्र टामने, श्री रमेश पारधी, श्री अनंत कावळे ,सौ कल्पना पनके, श्री अनिल शेंडे, श्री धनराज,ढोके, सौ शारदा शेंडे, सौ डॉ.सीमा तायडे ,सौ रूना राजेश पांडे,सौ. श्यामला टामने ,सौ सोनाली पारधी, सौ करुणा चांदे इ. चा समावेश होता.


0 टिप्पण्या