जन्म: १९ फेब्रुवारी १६३०, शिवनेरी किल्ला (पुणे) बालपण
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा: माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संस्कार आणि राजमातांनी त्यांना स्वराज्याचे स्वप्न दिले. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पराक्रम: तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अफझलखानाचा वध, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका यांसारख्या प्रसंगांतून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची आणि साहसाची चुणूक दाखवली. राज्याभिषेक: ६ जून १६७४ रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते खऱ्या अर्थाने 'छत्रपती' झाले.
शिवाजी महाराज केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले राजे होते: स्त्री सन्मान: शत्रूच्या स्त्रियांचाही आदर राखण्याची शिकवण त्यांनी दिली. अष्टप्रधान मंडळ: स्वराज्याचा कारभार शिस्तबद्ध चालवण्यासाठी त्यांनी या मंडळाची स्थापना केली. आरमाराचे जनक: भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे हे ओळखून त्यांनी स्वतःचे आरमार (Navy) उभे केले, म्हणून त्यांना 'भारतीय आरमाराचे जनक' मानले जाते. गनिमी कावा: कमी सैन्यात मोठ्या शत्रूला कसं नमवायचं, हे तंत्र त्यांनी जगाला शिकवले. रयतेचा राजा: शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी..." शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मौजा भोजापूर ता. जि. भंडारा येथील अपूर्वा कॉलनी येथे ग्राम स्वछता करून येथील ग्रामवासि्यांनी स्वच्छ व निरोगी आरोग्याचा संदेश दिला. शामलता कोहपरे, स्नेहल साखरवाडे, कुलभित भजेपूरे, माधूरी साठवणे, विजय लांडगे, किशोर दंडारे, पायल बोकरक, शोभा लिमजे, केशव चचाणे, किरण भजेभूजे, योगिता धांडे, ग्रामपंचायत सदस्य, पंकज सार्वे, सफाई कामगार महेश मेश्राम पुष्पराज नंदनवार.


0 टिप्पण्या