चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :- साकोली तालुक्यातील टिळक विद्यालय, खंडाळा येथे 28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर होते. प्रमुख अतिथी म्हणून पी. एन. कापगते सर, डी. डी. तुमसरे सर, ए. आर. कुंभरे सर, आर. एम. भेंडारकर सर, एम. यू. मेश्राम मॅडम, सुनील मेंढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वप्रेरणेने तयार केलेल्या आकर्षक व अभिनव विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग व संकल्पनांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे व डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी पी. एन. कापगते सर, डी. डी. तुमसरे सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून डॉ. रमण यांच्या जीवनप्रवासावर, त्यांच्या ‘रमण परिणाम’ या महत्त्वपूर्ण शोधावर आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून संशोधनाची आवड निर्माण करावी, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कु. तेजस्विनी सतीमेश्राम व कु. पूर्वी करंजेकर यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावी शब्दांत केले. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक देखणा व शिस्तबद्ध पार पडला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाला.


0 टिप्पण्या