Ticker

6/recent/ticker-posts

एचपीएल-८ चे थाटामाटात उद्घाटन संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उप बाजारपेठ हाळी येथील मैदानावर हाळी प्रिमियर लिग(HPL-8)चे उद्घाटन जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके,पं.स.सदस्य विक्की भोसले यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात दि.२८ फेब्रूवारी रोजी संपन्न झाले.
छ.शिवाजी महाराज जयंती निमित्ताने हाळी येथे खुल्या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ श्रीफळ फोडून तसेच जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके यांनी फलंदाजी तर पं.स.सदस्य विक्की भोसले यांनी गोलंदाजी करुन केला स्पर्धेच्या उद्घाटनापुर्वी छ. शिवाजी महाराज चौकातून मान्यवरांची फटाके व ढोल ताशांच्या गजरात मैदानात एन्ट्री झाली.मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.तर संयोजक सोहेल टप्पेवाले, तस्लिम हेटकूळे,ज्ञानेश्वर पोले यांच्यातर्फे पाहुण्यांचा फेटा बांधून सत्कार,स्वागत  करण्यात आला.
या क्रिकेट सामन्याचे प्रथम बक्षीस ५१ हजार रामचंद्र तिरुके(जि.प.सदस्य)दुसरे बक्षीस ३१ हजार विक्की भोसले(पं.स.सदस्य) ३ रे बक्षीस २१हजार खाजाभाई तांबोळी(ग्रापं.सदस्य,हाळी) आणि चौथे बक्षीस११हजार राजु पाटील(मा.उपसरपंच) यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.या स्पर्धेत ८ क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला.
मा.जि.प,सदस्य दयानंद कांबळे,जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील,हामजा शेख (टेलर) मनोज मसुरे,उध्दव माने,
कल्याण माने,गणपतराव माने, माजी सरपंच शिवाजीराव पाटील,हाकीमभाई डांगे,शेख कलीमभाई,मुस्तफाभाई टप्पेवाले सह शेकडो नागरिक व खेळाडू यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या